आज महिलांमध्ये गर्भाशय ग्रीवेचा म्हणजेच सर्व्हायकल कॅन्सर हा आजार मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतो आहे. भारतात दररोज जवळजवळ २०० महिलांचा मृत्यू सर्व्हायकल कॅन्सरमुळे होतो, ही बाब अत्यंत गंभीर आहे.
याचं मुख्य कारण म्हणजे वेळेवर तपासणी न होणं.
खरं तर, सर्व्हायकल कॅन्सर जर सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला गेला, तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच महिलांनी लाज किंवा भीती न बाळगता वेळेवर तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे.
सुखदा हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे आता अमेरिकेतून आयात केलेल्या B’ORZE डिजिटल व्हिडीओ कॉल्पोस्कोप द्वारे सर्व्हायकल भागाची तपासणी केली जाते.
हा डिजिटल व्हिडीओ कॉल्पोस्कोप जगातील अत्याधुनिक मशीन आहे. याच्या मदतीने गर्भाशयाच्या तोंडावर झालेले अगदी छोटे बदलसुद्धा स्पष्टपणे दिसतात.
या तपासणीत:
- गर्भाशयाच्या तोंडाला झालेली जखम
- फोड
- सूज
- गाठ
- तसेच सर्व्हायकल कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं
हे सगळं टी.व्ही. किंवा कॉम्प्युटर स्क्रीनवर मोठं करून दाखवलं जातं. त्यामुळे डॉक्टरांना लगेच कळतं की:
- खरंच गर्भाशयाचं ऑपरेशन गरजेचं आहे का
- की औषधोपचारांनीच उपचार करता येतील
यामुळे अनेक महिलांना अनावश्यक गर्भाशय काढण्याच्या ऑपरेशनपासून मुक्ती मिळते.
रुग्णांना इच्छेनुसार तपासणीचे रंगीत फोटोसुद्धा दिले जातात.
अनेक महिलांना वाटतं की कोल्पोस्कोपी म्हणजे ऑपरेशन असेल किंवा फार दुखेल.
पण प्रत्यक्षात,
- कोल्पोस्कोपी ही ऑपरेशन नाही
- ही एक साधी, सुरक्षित आणि जवळजवळ वेदनारहित तपासणी आहे
- फारसा वेळ लागत नाही
- तपासणीनंतर लगेच घरी जाता येतं
म्हणून कोणतीही भीती न बाळगता ही तपासणी करून घ्यावी.
सही समय पर सही जाँच – शरीर पर ना आये कोई आँच!
खालीलपैकी एकही लक्षण आढळल्यास कोल्पोस्कोपी आणि PAP स्मियर तपासणी त्वरित करून घ्यावी:
- अंगावरून पांढरं पाणी जास्त प्रमाणात जात असल्यास
- पाळीच्या वेळी खूप जास्त रक्तस्त्राव होत असल्यास
- पाळी बंद झाल्यानंतर पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाल्यास
- PAP (पेप) तपासणी नॉर्मल नसेल तर
- जननेंद्रियांमध्ये खाज, फोड किंवा जखम असल्यास
- संभोगाच्या वेळी किंवा नंतर दुखणं किंवा रक्त येत असल्यास
- कुटुंबात कुणाला गर्भाशय किंवा स्तनाचा कॅन्सर झाला असल्यास
- दोनपेक्षा जास्त गर्भपात झालेले असल्यास
- वय ३० वर्षांपेक्षा जास्त असल्यास
- गर्भनिरोधक गोळ्या जास्त काळ घेतलेल्या असल्यास
- गर्भाशयाची जागा सरकलेली असल्यास
- बाळंतपण घरी झालं असल्यास
- लहान वयात लग्न आणि अपत्यप्राप्ती झाली असल्यास
सुखदा हॉस्पिटल, अहिल्यानगर मध्ये:
- सर्व्हायकल कॅन्सरची सुरुवातीच्या टप्प्यात ओळख
- आजाराच्या टप्प्यानुसार योग्य उपचार
- गरज नसताना ऑपरेशन टाळण्यावर भर
- रुग्णांना सविस्तर समजावून मार्गदर्शन
हे सगळं अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली केलं जातं
डॉ. सौ. मिनाक्षी अ. करडे
डॉ. अमित करडे
महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत विश्वासार्ह आणि अनुभवी डॉक्टर.
तपासणीपासून उपचारापर्यंत योग्य सल्ला आणि काळजी दिली जाते.
सर्व्हायकल कॅन्सर हा आजार गंभीर असला तरी
वेळीच तपासणी केली तर तो पूर्णपणे टाळता येतो.
लाज, भीती किंवा दुर्लक्ष न करता
आजच सुखदा हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे कोल्पोस्कोपी आणि PAP स्मियर तपासणी करून घ्या.
आजची योग्य तपासणी
उद्या तुमचं आयुष्य वाचवू शकते.
Contact
Dr. Karade’s
Sukhada Hospital
Contact us to book consultation for compassionate care in maternity, gynecological issues across all ages, infertility treatments, and advanced laparoscopy surgeries for women.
Book Appointment:
02412329966
Emergency number:
9422224158
Address:
Opposite Police Colony, Balikashram Rd, Bagade Mala, Ahilya Nagar, Maharashtra 414001.
Meet The Doctors

Dr Amit Karade
M.B.B.S., D.G.O.
Consultant Gynecologist & Laparoscopic Surgeon

Dr. Minakshi Karade
M.B.B.S., D.G.O.
Consultant Gynecologist & Fertility Expert
आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत...
Our services
Sukhada Hospital offers compassionate and comprehensive care for women of all age groups, guiding them through every phase of life, from the joys of motherhood to the challenges of peri- and post-menopausal years.
Maternity Care:
Personalized care for a safe and joyous pregnancy, childbirth, and postnatal recovery.
Gynecology:
Expert solutions for women’s health concerns, from adolescence to menopause.
Laparoscopy:
Advanced minimally invasive procedures for precise diagnosis and treatment.
Infertility Treatments:
Evidence-based treatments to fulfill the dream of parenthood with care and support.
