गरोदरपणातील गैरसमज: Pregnancy Myths

Pregnancy is a beautiful journey, but it is often surrounded by numerous myths and old wives’ tales, especially in India. These misconceptions can cause unnecessary anxiety and confusion for expecting mothers. At Sukhada Hospital, Ahilyanagar, we believe in providing clear, evidence-based information. This detailed blog aims to debunk the most common pregnancy and C-section myths, giving you the clarity you need for a healthy and worry-free maternity experience.

गरोदरपण हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक खास आणि सुंदर टप्पा असतो. या काळात अनेक आनंद, उत्सुकता आणि काही प्रमाणात चिंताही असते. पण या काळात अनेक गैरसमज आणि जुन्या रूढी-परंपरांच्या नावाखाली काही चुकीच्या गोष्टी समाजात पसरलेल्या आहेत. अहिल्यानगर येथील सुखदा हॉस्पिटलमध्ये आम्ही तुमच्या आरोग्याला प्राधान्य देतो आणि तुम्हाला प्रत्येक शंका-कुशंका दूर करण्यासाठी मदत करतो. गरोदरपणाशी संबंधित काही सामान्य गैरसमज आणि त्यामागचे सत्य आज आपण जाणून घेऊया:

  • गरोदर बाईचे पोट जास्त दिसत नसेल तर बाळाची वाढ व्यवस्थित होत नाही.

सत्य: खरेतर गरोदर बाईचे पोट ६ व्या ते ७ व्या महिन्यांनंतर व्यवस्थित दिसू लागते. अनेक स्त्रियांचे शरीर आणि पोटाची रचना वेगवेगळी असते. काही स्त्रियांचे पोट नैसर्गिकरित्या कमी दिसते, पण याचा अर्थ बाळाची वाढ खुंटली असा होत नाही. तरीही, जर तुम्हाला पोट खूपच कमी दिसत असेल आणि तुम्हाला काळजी वाटत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • नवरा-बायकोचा रक्तगट एक असल्यास लग्न केले तर चालते का?

 सत्य: हो. नवरा-बायकोचा रक्तगट एक असला तरी लग्न करण्यास कोणतीही अडचण नाही. बाळाच्या आरोग्यावर याचा कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही.

  • गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्या तर कधीच दिवस राहत नाहीत, किंवा गोळ्या चालू असताना गर्भ राहिल्यास बाळावर परिणाम होतात का?

सत्य: नाही. गर्भनिरोधक गोळ्यांचा परिणाम काही कालावधीपुरता असतो. गोळ्या घेणे बंद केल्यावर दिवस राहू शकतात. तसेच, गोळ्या चालू असताना चुकून गर्भ राहिला तरी, बाळावर कोणताही गंभीर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता खूप कमी असते. तरीही, डॉक्टरांना लगेच कळवणे महत्त्वाचे आहे.

  • पपई खाल्ल्याने गर्भपात होतो.

सत्य: कच्चे पपई गर्भपात करण्यास कारणीभूत ठरू शकते, पण बीज जमा होण्यासाठी (गर्भपात होण्यासाठी) तुम्हाला खूप मोठी मात्रा खावी लागते. आपण सामान्यतः जेवढी पपई खातो (उदा. एक-दोन फोडी), त्याने काहीही होत नाही. गरोदरपणात योग्य प्रमाणात पिकलेली पपई खाणे सुरक्षित असते.

  • गरोदरपणात केळी खाऊ नयेत.

सत्य: केळी खाल्ल्याने काहीही होत नाही. उलट केळीमध्ये फॉलिक ऍसिड आणि अनेक महत्त्वाची जीवनसत्त्वे असतात, जी गरोदरपणात आवश्यक असतात. योग्य प्रमाणात केळी खाणे सुरक्षित आणि फायदेशीर आहे.

  • गरोदरपणात सुरुवातीलाच नॉर्मल होईल की सिझेरीयन हे कळते.

सत्य: नाही. प्रसूती नॉर्मल होईल की सिझेरियन हे सहसा डिलीव्हरीची प्रक्रिया सुरु झाल्यावर किंवा बाळाची आणि आईची स्थिती पाहून ठरवले जाते. सुरुवातीला फक्त काही धोकादायक घटक (High Risk Factors) ओळखले जाऊ शकतात.

  • गरोदरपणात रक्तवाढीच्या व कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्या तर सिझर होते?

सत्य: नाही. रक्तवाढीच्या (आयर्न) आणि कॅल्शियमच्या गोळ्या आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असतात. सिझरची कारणे बाळाची स्थिती (उदा. उलट्या दिशेने असणे), आईचा रक्तदाब, जुळी मुले किंवा इतर वैद्यकीय गुंतागुंत वेगळी असतात.

  • डॉक्टर पैशांसाठी सिझर करतात.

सत्य: नाही. सिझेरियन प्रसूतीचा निर्णय हा नेहमी पेशंटशी व बाळाशी संबंधित गंभीर वैद्यकीय कारणांसाठी घेतला जातो. सिझेरियनची गरज आहे की नाही हे ठरवण्यासाठी डॉक्टर रुग्णाचे आरोग्य, बाळाची स्थिती आणि प्रसूतीदरम्यान निर्माण होणारी गुंतागुंत यांचा विचार करतात.

  • सिझरसाठी पाठीतून दिलेले इंजेक्शन आयुष्यभर दुखते?

सत्य: नाही. सिझेरियनसाठी दिलेले हे ‘स्पायनल ऍनेस्थेसिया’ इंजेक्शन असते. त्याचा परिणाम फक्त काही तास असतो. आयुष्यभर कंबर दुखीचा आणि या इंजेक्शनचा कोणताही थेट संबंध नाही.

  • सिझरमुळे कंबरदुखी होते व वजन वाढते?

सत्य: सिझेरियनमुळे थेट कंबरदुखी होत नाही. कंबरदुखी सहसा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होते, जी गरोदरपण आणि स्तनपानाच्या काळात सामान्य आहे. वजन वाढणे हे अतिरिक्त आणि चरबीयुक्त आहार, तसेच पुरेशा आराम आणि व्यायामाचा अभाव यांमुळे होते. नॉर्मल डिलीव्हरीनंतरही हे कारण असल्यास वजन वाढते. सिझेरियन हा केवळ एक मार्ग आहे.

  • सिझरने पेशंट अधू होते.

सत्य: नाही. आता सिझेरियनचे टाके (C-Section Scars) सहसा पोटाच्या खालच्या भागात आडवे असतात, जे वैद्यकीयदृष्ट्या सुरक्षित आणि बरे होण्यास सोपे असतात. योग्य काळजी घेतल्यास रुग्ण लवकर सामान्य जीवन जगू शकते.

  • सिझरने पेशंटना वाटते की नंतर पोटात कधीही दुखले तर सिझरमुळे दुखते.

 सत्य: नाही. सिझेरियन शस्त्रक्रियेत केवळ गर्भपिशवीवर प्रक्रिया होते. पोटात गर्भपिशवी सोडून इतर बरेच अवयव (उदा. आतडे, मूत्रपिंड) असतात व पोट दुखण्याची इतर असंख्य कारणे असू शकतात (उदा. ऍसिडिटी, गॅस, अपचन).

सुखदा हॉस्पिटलमध्ये आम्ही नेहमीच वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. तुमच्या गरोदरपणात कोणताही संभ्रम असल्यास किंवा अधिक माहितीसाठी, आमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांशी संपर्क साधा.

निरोगी आणि आनंदी गरोदरपणासाठी, सुखदा हॉस्पिटल सदैव तुमच्यासोबत!

Contact

Dr. Karade’s
Sukhada Hospital

Contact us to book consultation for compassionate care in maternity, gynecological issues across all ages, infertility treatments, and advanced laparoscopy surgeries for women.

Address:

Opposite Police Colony, Balikashram Rd, Bagade Mala, Ahilya Nagar, Maharashtra 414001.

Meet The Doctors

Dr. Amit Karade

Dr Amit Karade

M.B.B.S., D.G.O.
Consultant Gynecologist & Laparoscopic Surgeon

Dr. Minakshi Karade

Dr. Minakshi Karade

M.B.B.S., D.G.O.
Consultant Gynecologist & Fertility Expert

आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत...

years experience
0 +
Deliveries
0 +
Surgeries
0 +
Our services

Sukhada Hospital offers compassionate and comprehensive care for women of all age groups, guiding them through every phase of life, from the joys of motherhood to the challenges of peri- and post-menopausal years.

Maternity Care:

Personalized care for a safe and joyous pregnancy, childbirth, and postnatal recovery.

Gynecology:

Expert solutions for women’s health concerns, from adolescence to menopause.

Laparoscopy:

Advanced minimally invasive procedures for precise diagnosis and treatment.

Infertility Treatments:

Evidence-based treatments to fulfill the dream of parenthood with care and support.

Scroll to Top