Pregnancy Diet Plan & Tips by Dr. Minakshi Karade

Confused about what to eat during pregnancy? Read above full-day easy-to-follow Indian diet plan tailored for expectant mothers — packed with nutrition and adapted to Indian food habits. Also, find out what foods to avoid for a safe and healthy pregnancy. A must-read for every mom-to-be!

Read More About
Pregnancy Diet Plan & Tips

गर्भधारणा ही स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची आणि संवेदनशील अशी एक अवस्था असते. या काळात शारीरिक आणि मानसिक बदल होतात, आणि बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने आईने घेतलेला आहार फारच निर्णायक ठरतो. योग्य आहारामुळे बाळाचा वाढ व विकास योग्य रीतीने होतो आणि आईचेही आरोग्य टिकून राहते.

या ब्लॉगमध्ये सुखदा हॉस्पिटल, अहिल्यानगर येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. करडे यांनी सांगितलेला एकदिवसीय आहारयोजना दिली आहे. ही योजना भारतीय स्वयंपाकशैली आणि आपले रोजचे खाद्यसंस्कार लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे, त्यामुळे ती सहजपणे पाळता येण्यासारखी आहे.

यामध्ये कोणत्या अन्नपदार्थांचा समावेश करावा, कोणती पौष्टिकता आवश्यक आहे, आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याचे सविस्तर मार्गदर्शन दिले आहे.

गर्भवती महिलांसाठी उपयुक्त आणि विज्ञानाधारित अशी ही माहिती अवश्य वाचा आणि आपल्या आरोग्यासाठी योग्य पावले उचला!

सकाळी ६ ते ७ :
ध्यान, धारणा, योगासने, प्राणायाम

सकाळी ७ वा.:
उपाशीपोटी रात्री भिजवलेले ३-४ बदाम, १ सुके अंजीर, १०-१२ काळ्या मनुका, १-२ अक्रोड, १-२ जर्दाळू, ४-५ चमचे पंचामृत, डिंकाचा लाडू

सकाळी ८ वा. :
१ ग्लास दूध+ २ चमचे प्रोटीन पावडर + १-२ केशर काड्या, चवीपुरती साखर, हवी असल्यास इलायची पावडर, १ चमचा खारीक पूड

सकाळी ९ वा.:
नाष्टा – पोहे, उपीट, शेवयाचे उपीट, शाबुदाणा खिचडी, मेथीचा पराठा, पालक पराठा, बटाट्याचा पराठा, इडली, डोसा, ढोकळा, सुरळीच्या वड्या, १ वाटी मोड आलेले कडधान्य, मटकी, मुग, कुळीथ, मसुर यापैकी एक

दु. १२ वा.:
जेवण – १ वाटी घरी बनवलेले ताक, पापड, कोशींबीर, काकडी, टोमॅटो, गाजर, कोबी, मुळा, बीट यापैकी एक. हिरवी चटणी – कोथिंबीर, खोबरे, लिंबू, पुदीना, आले, मिरची, मीठ;

चपाती, भात + वरण + तुप + लिंबु पिळुन

भाजी – दोडका, दुधी भोपळा, तोंडले, बटाटा, पडवळ, भेंडी, लाल भोपळा, कारले, वाल यापैकी एक

दु. ३-४ वा. दु. ४ वा. :
वामकुक्षी (गाढ झोपू नये, थोडा आराम करावा)

संध्या. ७ वा. :
रोज एक फळ – सफरचंद, डाळींब, संत्री, मोसंबी, द्राक्षे, अंजीर, केळी, १-२ खजुर तुपात भिजवून काळा गुळ + शेंगादाणे, कोकम सरबत, नारळपाणी

रात्री ९ वा.: 
जेवण, कोशिंबीर, हिरवी चटणी, भाकरी, भात + वरण + तुप + लिंबू

पातळभाजी – पालक, तांदुळजा, शेवग्याच्या शेंगा, शेपु, आंबट चुका, मुळ्याच्या पानांची भाजी यापैकी एक

रात्री १० वा. :
दुध + २ चमचे प्रोटीन पावडर + १-२ केशर काड्या, चवीपुरती साखर + इलायची पावडर + १ चमचा खारीक पुड. 

शतपावली, रामरक्षा वाचन, संगीत ऐकणे

आहारात काय टाळावे :- What to avoid in diet during pregnancy?

१. भाज्या – रताळे, सुरण, मका, मशरुम, सिमला, गवार, वांगे, कांद्याची पात.

२. फळे – आंबा, पपई, बोरे, कवट, अननस, स्टॉबेरी

३. जड पदार्थ – चीज

४. मैद्याचे पदार्थ – बिस्कीट, नुडल्स, केक, भेळपुरी, दहीपुरी, पाणीपुरी, फरसाण

५. शीतपेये

६. बेकरी प्रोडक्टस

७. हॉटेलमधील भाज्या

८. कमी शिजवलेले अंडे, मांसाहार

९. डबा बंद रस Processed Foods

१०. कडधान्ये – उडीद, हरभरे, चणे, छोले, चवळी, राजमा, वाटाणा

जेवताना आवर्जुन करावयाच्या गोष्टी :

१. जेवणापूर्वी आपल्या आद्य देवतेचे नाव घ्यावे, वदनी कवळ म्हणावे व प्रसन्न मनाने जेवायला बसावे.

२. जेवताना चीड-चीड करु नये. दुसरीकडचा राग अन्नावर काढु नये. जेवण बनवणाऱ्या व्यक्तीवर खेकसु नये.

३. जेवण ताजे असावे.

४. हळुहळु सावकाश चावुन चावून अन्न खावे, भराभरा मोठे घास गिळु नये.

५. जेवल्यानंतर लगेचच घटा-घटा पाणी पिऊ नये, काही वेळ जाऊ द्यावा, थोडे फिरावे, १५-२० मिनिटांनी पोटभर पाणी प्यावे. जेवल्यानंतर लगेचच झोपु नये.

६. निसत्त्व, शिळे व अपुरे जेवण घेऊ नये. कोणत्याही एका चवीची आवड म्हणून अतिरेक करु नये.

७. खूप तिखट, उपट, मसालेदार, फार खारट, आंबट अन्न खाऊ नये.

शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा –

आई आनंदी, तर बाळही आरोग्यदायी! प्रसूतीनंतर आईची काळजी घेणे म्हणजे फक्त तिचे नाही तर एका नव्या जीवाच्या सुरळीत सुरुवातीसाठी केलेलं महत्वाचं पाऊल आहे.

Contact

Dr. Karade’s
Sukhada Hospital

Contact us to book consultation for compassionate care in maternity, gynecological issues across all ages, infertility treatments, and advanced laparoscopy surgeries for women.

Address:

Opposite Police Colony, Balikashram Rd, Bagade Mala, Ahilya Nagar, Maharashtra 414001.

Meet The Doctors

Dr. Amit Karade

Dr Amit Karade

M.B.B.S., D.G.O.
Consultant Gynecologist & Laparoscopic Surgeon

Dr. Minakshi Karade

Dr. Minakshi Karade

M.B.B.S., D.G.O.
Consultant Gynecologist & Fertility Expert

आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत...

years experience
0 +
Deliveries
0 +
Surgeries
0 +
Our services

Sukhada Hospital offers compassionate and comprehensive care for women of all age groups, guiding them through every phase of life, from the joys of motherhood to the challenges of peri- and post-menopausal years.

Maternity Care:

Personalized care for a safe and joyous pregnancy, childbirth, and postnatal recovery.

Gynecology:

Expert solutions for women’s health concerns, from adolescence to menopause.

Laparoscopy:

Advanced minimally invasive procedures for precise diagnosis and treatment.

Infertility Treatments:

Evidence-based treatments to fulfill the dream of parenthood with care and support.

Scroll to Top