प्रसूती ही स्त्रीच्या आयुष्यातील एक अतिशय महत्वाची आणि नाजूक अवस्था असते. प्रसूतीनंतर बाळंतिणीचे (नवमातेचे) शारीरिक व मानसिक आरोग्य व्यवस्थित राखणे अत्यंत गरजेचे असते. ही काळजी योग्य प्रकारे घेतली गेल्यास आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य उत्तम राहते.
Read more about
Post Delivery Care of New Mothers
प्रसूतीनंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर १५ दिवसांनी एकदा आणि नंतर दर महिन्याला तीन वेळा डॉक्टरांकडे फेरतपासणीसाठी बोलावले जाते. यामध्ये आई आणि बाळाची पूर्ण तपासणी केली जाते आणि आहार, व्यायाम, स्तनपान, लसीकरण, कुटुंबनियोजन इत्यादी बाबतीत सल्ला दिला जातो.
- पहिले दीड महिना पूर्ण विश्रांती घ्या, पण जेवणानंतर थोडं चालणं, पाय हलवणं आणि श्वसनाचे व्यायाम जरूर करा.
- यामुळे शरीर फ्रेश वाटतं, लघवी साफ होते, शौचास अडचण राहत नाही, गर्भाशय लवकर आकुंचन पावतो आणि रक्तात गाठी न बनता शरीर साफ होतं.
- लघवी थांबवून ठेवू नका.
- पोट साफ राहणं गरजेचं आहे. यासाठी भरपूर पाणी, पालेभाज्या, दूध, आणि त्रिफळा चूर्ण किंवा गरम दुधात तूप घेणे उपयुक्त ठरतं.
- गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने Cremaffine Gel घेऊ शकता.
- दिवसा २ तास व रात्री ८ तास झोप अत्यावश्यक आहे.
- घरात तणावमुक्त वातावरण ठेवा. चिंता, झोपेचा अभाव यामुळे थकवा आणि दूध कमी होण्याची शक्यता असते.
- आई व बाळाला एकत्र झोपवावं. यामुळे बाळाशी नातं लवकर जुळतं आणि स्तनपान सुरळीत चालू राहतं.
- दिवसातून दोनदा स्तन धुवा.
- प्रत्येक स्तनपानापूर्वी निप्पल स्वच्छ कॉटन किंवा रुमालाने पुसा.
- दर दोन तासांनी स्तनपान करावं.
- अंघोळीपूर्वी स्तनांना हलक्या हाताने मसाज करा. निप्पल आत गेलेले असतील तर हळूच बाहेर ओढा.
सिझेरियन टाके:
- टाके काढल्यानंतर दररोज अंघोळीवेळी स्वच्छ करा, अँटीबायोटिक पावडर लावा. ड्रेसिंगची गरज नाही.
नॉर्मल डिलीव्हरी टाके:
- पालथी मांडी घालावी, पण साधी मांडी टाळा.
- लघवी/शौचास जाऊन आल्यावर गरम पाणी व साबणाने टाके धुवा आणि क्रीम लावा.
- कॉटन पॅड वापरा, कपडे नाही. पॅड दिवसातून दोनदा बदला.
- सिझेरनंतर १५ दिवसांनी आणि नॉर्मल डिलीव्हरीनंतर दुसऱ्या दिवसापासून अभ्यंग करावा.
- पोट, कंबर, स्तनांवर तेल लावा, एक तासाने अंघोळ करा.
- कानात कापूस घाला, डोक्यावर स्कार्फ बांधा.
- दीड महिन्यापर्यंत पोटाला पट्टा बांधावा.
- दीड महिना शारीरिक संबंध टाळा व ३ महिने जड वजन उचलू नका.
- दीड महिना पूर्ण झाल्यानंतर हळूहळू नेहमीची घरकामे सुरू करू शकता.
- परंतु अति थकवा होणार नाही याची काळजी घ्या.
खालील लक्षणांमध्ये विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा:
- चक्कर, डोकेदुखी, उलटी, मळमळ
- अंधुक दिसणे
- ताप येणे
- जास्त रक्तस्त्राव
- दुर्गंधीयुक्त स्त्राव
- पोटात तीव्र दुखणे
- दूध कमी होणे किंवा स्तनांमध्ये गाठ
- आईला चिडचिड, झोप न लागणे
- टाक्यांवर सूज, टाके सुटणे, पाणी येणे
अन्य कोणतीही असामान्य लक्षणे
शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा –
आई आनंदी, तर बाळही आरोग्यदायी! प्रसूतीनंतर आईची काळजी घेणे म्हणजे फक्त तिचे नाही तर एका नव्या जीवाच्या सुरळीत सुरुवातीसाठी केलेलं महत्वाचं पाऊल आहे.
Contact
Dr. Karade’s
Sukhada Hospital
Contact us to book consultation for compassionate care in maternity, gynecological issues across all ages, infertility treatments, and advanced laparoscopy surgeries for women.
Book Appointment:
02412329966
Emergency number:
9422224158
Address:
Opposite Police Colony, Balikashram Rd, Bagade Mala, Ahilya Nagar, Maharashtra 414001.
Meet The Doctors

Dr Amit Karade
M.B.B.S., D.G.O.
Consultant Gynecologist & Laparoscopic Surgeon

Dr. Minakshi Karade
M.B.B.S., D.G.O.
Consultant Gynecologist & Fertility Expert
आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत...
Our services
Sukhada Hospital offers compassionate and comprehensive care for women of all age groups, guiding them through every phase of life, from the joys of motherhood to the challenges of peri- and post-menopausal years.
Maternity Care:
Personalized care for a safe and joyous pregnancy, childbirth, and postnatal recovery.
Gynecology:
Expert solutions for women’s health concerns, from adolescence to menopause.
Laparoscopy:
Advanced minimally invasive procedures for precise diagnosis and treatment.
Infertility Treatments:
Evidence-based treatments to fulfill the dream of parenthood with care and support.
