स्तनपानाचे फायदे, अडचणी, स्तनपान कधी टाळायचे असते?

जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने  (World Breast Feeding Week 1st to 7th August)

पहिले स्तनपान :

बाळ, बाळंतीण स्वच्छ झाल्यानंतर साधारण 30-40 मिनिटात बाळाला प्यायला घ्यावे. यावेळेत प्यायला घेतल्यास बाळ दूध ओढण्याची क्रिया अगदी सहजपने करू शकते. कारण ही क्रिया बाळाला निसर्गाकडून उपजतच असते.

आईचे पहिले दूध हे एक रसायन असते व ते बाळाच्या पोटात जाणे आवश्यक असते. बाळाने दूध नीट ओढल्यास दूध लवकर व व्यवस्थित चालू होते.

बाटली किंवा वाटी चमच्याने दूध पाजल्यास बाळ दूध ओढण्याचे टाळू लागते. त्यामुळे पुढे आई व बाळ दोघांनाही त्रास होतो.

स्तनपानाचे फायदे :

बाळ :

– आईचे दूध बाळाच्या सवयी चे असते त्यामुळे ते कुठल्याही त्रासाशिवाय बाळाकडून स्वीकारले जाते

 – बाळासाठी सर्व आवश्यक तत्तवे दुधात असल्याने बाळाचे व्यवस्थित वजन वाढते.

-आई जो आहार, रसायने, औषधं घेते ते साररूपाने बाळाला मिळते त्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती, बौद्धिक शारीरिक व मानसिक वाढ सहज व उत्तम प्रकारे होते.

-आईचे दूध बाळाला डायरेक्ट मिळत असल्याने ते खराब होणे, शिळे होणे, जंतूसंसर्ग होणे, फार गरम व थंड होणे हे प्रकार होत नाही.

– दुधाबरोबर बाळाला आईचे प्रेम मिळत असल्याने त्याला सुरक्षित वाटते.

– आईच्या दुधामुळे बाळाचे पोट व्यवस्थित साफ होते.

आई:

– बाळ जोवर फक्त आईचे दूध पिते तोवर तिला सहसा पाळी येत नाही व दरम्यान तिला परत गर्भ राहण्याची शक्यता कमी असते.

–  स्तनपानामुळे बाळंतपणानंतर गर्भाशय व्यवस्थित आकुंचन पावते व रक्तस्त्राव कमी होतो.

– ज्या माता बाळाला स्तनपान करतात त्यांना भविष्यात स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.

तात्पुरती कारणे :-

आईला ताप असल्यास, निप्पलला भेगा पडलेल्या असल्यास, स्तनला इन्फेकशन किंवा Abscess होणे, बाळ कमी वजनाचे असल्यास, बाळ गंभीर आजारी असल्यास…

कायमस्वरूपी स्तनपान टाळावे :-

आईला गंभीर आजार किंवा टीबी असल्यास, आईला कॅन्सर ची औषधं चालू असल्यास, बाळाची टाळू फाटलेली असल्यास…

1) दूध कमी होण्याची कारणे- आईने क्रोध, अतिशोक केल्यास , वास्तल्याचा अभाव, उपवास, अतीव्यायाम, चिंता, शारीरिक व मानसिक तणाव यामुळे दूध कमी  होते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व काही औषधं चालू करावी.

– शतावरी कल्प दुधात घालून सकाळ – संध्याकाळी घ्यावे.

-हळीवाची खीर सकाळ – संध्याकाळी घ्यावी.

– तांदूळ, खसखस किंवा रव्याची खीर खावी.

– घरचे ताजे लोणी – खडीसाखर, साजूक तूप खावे.

2) आईला अजीर्ण झाल्यास, फार कडू, खारट, शिळे अन्न खाल्याने, दुपारी झोपल्याने, पनीर दही पदार्थ खाल्याने, खूप जागरण झाल्याने, दुधाचा रंग, चव, गंध वगैरे बिघडतात.

– भाजी, आमटीच्या फोडणीत मेथ्या टाकल्याने दूध शुद्ध राहते. जिरे सुद्धा दूधशुद्धीसाठी उत्तम आहेत.

– मुखशुद्धी म्हणून ओवा, बाळंतशेप, तिळाची सुपारी जेवणानंतर खावी.

– कुळीथाचे सूप

– स्तनाना तेलाने मसाज करावा.

टीम सुखदा हॉस्पिटल
डॉ मीनाक्षी करडे, डॉ अमित करडे
Emergency contact no 9422224158

To schedule your consultation at Sukhada Hospital in Ahilyanagar, contact us.

Contact

Dr. Karade’s
Sukhada Hospital

Contact us to book consultation for compassionate care in maternity, gynecological issues across all ages, infertility treatments, and advanced laparoscopy surgeries for women.

Address:

Opposite Police Colony, Balikashram Rd, Bagade Mala, Ahilya Nagar, Maharashtra 414001.

Meet The Doctors

Dr. Amit Karade

Dr Amit Karade

M.B.B.S., D.G.O.
Consultant Gynecologist & Laparoscopic Surgeon

Dr. Minakshi Karade

Dr. Minakshi Karade

M.B.B.S., D.G.O.
Consultant Gynecologist & Fertility Expert

आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत...

years experience
0 +
Deliveries
0 +
Surgeries
0 +
Our services

Sukhada Hospital offers compassionate and comprehensive care for women of all age groups, guiding them through every phase of life, from the joys of motherhood to the challenges of peri- and post-menopausal years.

Maternity Care:

Personalized care for a safe and joyous pregnancy, childbirth, and postnatal recovery.

Gynecology:

Expert solutions for women’s health concerns, from adolescence to menopause.

Laparoscopy:

Advanced minimally invasive procedures for precise diagnosis and treatment.

Infertility Treatments:

Evidence-based treatments to fulfill the dream of parenthood with care and support.

Scroll to Top