गरोदरपणात केळी खावी की नाही? Is it Safe to eat banana in pregnancy

Sukhada Hospital - गरोदरपणात केळी खावी की नाही

गरोदरपणात केळी खावी की नाही? याबद्दल खूप गैरसमज आहेत. खूप स्त्रियांना केळी खायला आवडते ,पण घरच्या वडीलधाऱ्या स्त्रिया परवानगी देत नाहीत. केळीने पोट दुखते,गर्भपात होतो,लवकर डिलिव्हरी होते असा मोठा चुकीचा समज आहे.कारण ह्या मताला कुठलाही शास्त्रोक्त आधार नाही.

हा, केळीच्या सालावरून पाय घसरला तर, पोट दुखू शकते, हा प्रकार आहे 🤣🤣🤣

काळे डाग पडलेली केळी चांगली पिकलेली असते ,ती खाणे सगळ्यात उत्तम. केळी हे फळ तसे स्वस्त आहे,आपल्याकडचे आहे,बाराही महिने केळी उपलब्ध असते,त्यामुळे ती खाणे जास्त किफायतशीर आहे.

कुठलीही फळे दुधासोबत खाऊ नयेत असे आयुर्वेद सांगते,पण शिकरण हे आपले पारंपरिक मिष्टान्न आहे.त्यामुळे हा एक वादाचा मुद्दा होऊ शकतो.

केळी खाण्याचे फायदे

1.केळी खाल्याने इन्स्टंट कॅलरीज व ऊर्जा मिळते.

2.केळी मध्ये फॅट्स नाहीत,त्यामुळे अनावश्यक वजन वाढत नाही.

3.केळी मध्ये बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, सी व्हिटॅमिन, कॅल्शियम असते.

4.केळीमध्ये फक्त प्रोटीन ची कमतरता असते.

5.केळी मध्ये कॅन्सरच्या विरुद्ध काम करणारी तत्वे असतात.

6.केळी प्रतिकार शक्ती वाढवते.

7.उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी पण केळी खाणे चांगले असते.

8.केळी मध्ये भरपूर फायबर असल्याने पोट व्यवस्थित साफ होते. तसेच अपचन व जुलाब होत असल्यास केळी खाल्याने पोट पूर्ववत होते.

9.सतत तोंड येत असल्यास कच्ची केळी खावी.

10.केळी मधील tryptophan नावाचे amino acid तणाव कमी करते. serotonin मुळे मूड चांगला होतो.

11.मधुमेही व्यक्तींनी फक्त केळी खाणे टाळावे.

टीम सुखदा हॉस्पिटल

डॉ. मिनाक्षी करडे, डॉ. अमित करडे

Contact

Dr. Karade’s
Sukhada Hospital

Contact us to book consultation for compassionate care in maternity, gynecological issues across all ages, infertility treatments, and advanced laparoscopy surgeries for women.

Address:

Opposite Police Colony, Balikashram Rd, Bagade Mala, Ahilya Nagar, Maharashtra 414001.

Meet The Doctors

Dr Amit Karade

M.B.B.S., D.G.O.
Consultant Gynecologist & Laparoscopic Surgeon

Dr. Minakshi Karade

M.B.B.S., D.G.O.
Consultant Gynecologist & Fertility Expert

आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत...

years experience
0 +
Deliveries
0 +
Surgeries
0 +
Our services

Sukhada Hospital offers compassionate and comprehensive care for women of all age groups, guiding them through every phase of life, from the joys of motherhood to the challenges of peri- and post-menopausal years.

Maternity Care:

Personalized care for a safe and joyous pregnancy, childbirth, and postnatal recovery.

Gynecology:

Expert solutions for women’s health concerns, from adolescence to menopause.

Laparoscopy:

Advanced minimally invasive procedures for precise diagnosis and treatment.

Infertility Treatments:

Evidence-based treatments to fulfill the dream of parenthood with care and support.

Scroll to Top