प्रत्येक गर्भवती स्त्रीची इच्छा असते की तिची डिलिव्हरी नैसर्गिकरित्या आणि सुरक्षित होवो. मात्र काही वेळा परिस्थिती अशी निर्माण होते की डॉक्टरांना सिझेरियन (Cesarean Section) डिलिव्हरी करण्याचा निर्णय घ्यावा लागतो.
सिझेरियन ही उपचार पद्धती निसर्गाच्या विरोधात नसून, आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ठरते.
सिझेरियन म्हणजे बाळंतपणासाठी उदरावर चीरा करून गर्भाशयातून बाळ बाहेर काढण्याची शस्त्रक्रिया. ती सामान्यतः त्या वेळेस केली जाते जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी शक्य नसते किंवा जोखीमदायक ठरते.
सिझेरियन डिलिव्हरीचे दोन प्रमुख गट आहेत:
🟪 पहिला गट – नॉर्मल डिलिव्हरी अशक्य असणे:
- गर्भपिशवीचा तोंडावर वारा असणे
- योनीमार्गात कॅन्सरचा गोळा असणे
- गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर
- योनिमार्गाचे किंवा मूत्रमार्गाचे ऑपरेशन झालेलं असणे
🟪 दुसरा गट – नॉर्मल डिलिव्हरीमध्ये अडथळा असणे:
- बाळाच्या ठोक्यांमध्ये घसरण किंवा अनियमितता
- बाळाचे उलटे, आडवे स्थान
- बाळाने पोटात शी करणे
- बाळाचे वजन जास्त असणे
- आईला मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब असणे
- आधीचे दोन किंवा अधिक सिझेरियन
- नाळ बाहेर येणे (cord prolapse)
- प्रसव मार्ग अरुंद असणे
सिझेरियन डिलिव्हरीचे प्रमाण वाढण्यामागे अनेक सामाजिक, वैद्यकीय व तांत्रिक कारणे आहेत:
- गर्भावस्थेतील गुंतागुंती आधीच लक्षात येतात – यामुळे जोखीम टाळण्यासाठी सिझेरियन निवडले जाते.
- आईचे वय वाढलेले असणे – वय वाढल्याने मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा यांसारख्या अडचणी निर्माण होतात.
- पहिलं सिझेरियन आणि कमी अंतराने दुसरं गरोदरपण
- टेस्ट ट्यूब बेबी किंवा वंध्यत्व उपचारानंतरची गर्भधारणा
- सुखवस्तू महिला अधिक काळजी घेतात – बाळाचे वजन वाढते.
- मशिन्समुळे बाळाचे गुदमरणे पटकन लक्षात येते
- बरेचदा आई स्वतः डिलिव्हरीचा त्रास टाळण्यासाठी सिझेरियनला पसंती देते
- ऑपरेशन व भूलतज्ञांची सुरक्षित पद्धत विकसित झाली आहे
होय, आजच्या घडीला सिझेरियन अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक प्रक्रिया आहे. योग्य अनुभवी डॉक्टर, प्रशिक्षित भूलतज्ञ, आधुनिक यंत्रणा आणि निगा राखणारी टीम असली की सिझेरियनमुळे आई आणि बाळ दोघेही सुरक्षित राहू शकतात.
✅ अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अमित करडे आणि डॉ. मिनाक्षी करडे यांचे मार्गदर्शन
✅ उच्च दर्जाचे ऑपरेशन थिएटर व सुविधा
✅ अनुभवी भूलतज्ज्ञ आणि नर्सिंग स्टाफ
✅ 24×7 मातृत्व सेवा आणि इमर्जन्सी डिलिव्हरीची सोय
✅ प्रसूतीनंतर आई व बाळाची स्नेहपूर्ण निगा
✅ किफायतशीर दरात सुरक्षित व सुसज्ज उपचार
📌 निष्कर्ष:
सिझेरियन ही “शस्त्रक्रिया” असली तरी ती एका आई व बाळाच्या आरोग्यासाठी घेतलेला योग्य निर्णय असतो. योग्य कारणांमुळे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने सिझेरियन डिलिव्हरी केल्यास ती पूर्णतः सुरक्षित असते.
🤱 अधिक माहिती किंवा अपॉइंटमेंटसाठी संपर्क करा:
📍 सुखदा हॉस्पिटल, अहिल्यनगर
To schedule your consultation at Sukhada Hospital in Ahilyanagar, contact us.
Contact
Dr. Karade’s
Sukhada Hospital
Contact us to book consultation for compassionate care in maternity, gynecological issues across all ages, infertility treatments, and advanced laparoscopy surgeries for women.
Book Appointment:
02412329966
Emergency number:
9422224158
Address:
Opposite Police Colony, Balikashram Rd, Bagade Mala, Ahilya Nagar, Maharashtra 414001.
Meet The Doctors

Dr Amit Karade
M.B.B.S., D.G.O.
Consultant Gynecologist & Laparoscopic Surgeon

Dr. Minakshi Karade
M.B.B.S., D.G.O.
Consultant Gynecologist & Fertility Expert
आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत...

Our services
Sukhada Hospital offers compassionate and comprehensive care for women of all age groups, guiding them through every phase of life, from the joys of motherhood to the challenges of peri- and post-menopausal years.
Maternity Care:
Personalized care for a safe and joyous pregnancy, childbirth, and postnatal recovery.
Gynecology:
Expert solutions for women’s health concerns, from adolescence to menopause.
Laparoscopy:
Advanced minimally invasive procedures for precise diagnosis and treatment.
Infertility Treatments:
Evidence-based treatments to fulfill the dream of parenthood with care and support.